• Home
  • शिवसेनेपाठोपाठ आणखी एक मित्रपक्ष… भाजपची साथ सोडणार! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

शिवसेनेपाठोपाठ आणखी एक मित्रपक्ष… भाजपची साथ सोडणार! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 शिवसेनेपाठोपाठ आणखी एक मित्रपक्ष… भाजपची साथ सोडणार! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ शिवसेनेनंतर आता भाजपचा जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दलही ‘एनडीए’तून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी शेतकरी आणि इंधनाच्या वाढत्या दरावरुन मोदी सरकारला घेरले आहे. मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा बादल यांनी दिला आहे.

मंत्रिपद आणि आघाडी ही आमच्यासाठी शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोलाची नाही. आम्ही मंत्रीमपदाचा त्याग करु शकतो, असं शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले. अकाली दलाच्या लोकसभेत दोन, तर राज्यसभेत तीन जागा आहेत. पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत.
डिझेलच्या वाढत्या किमतींबद्दल बोलताना सुखबीर सिंह बादल म्हणाले, पंजाब सरकार (काँग्रेस) डिझेलवरील दहा रुपयांची किंमत कमी करण्यास तयार असेल, तर पंजाबमधील सर्व राजकीय पक्षांसह दिल्लीत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाला बसण्यास आम्ही तयार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १८ दिवसांत देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. धान पेरणीसाठी कामगार शुल्कामध्ये झालेल्या वाढीमुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. आता डिझेलच्या दरातील वाढीचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. केंद्र सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असं सुखबीर सिंह बादल म्हणाले. केंद्र सरकार आश्वासन देऊनही एमएसपी आणि खरेदीचे आश्वासन पाळत नसेल तर अकाली दल ना आघाडीची तमा बाळगेल, ना सरकारमधील भागीदारीची. अकाली दल कोणत्याही त्यागासाठी तयार आहे, असा इशारा बादल यांनी दिला…⭕

anews Banner

Leave A Comment