Home Breaking News दिलासादायक” नांदेडात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला, गुरुवारी पुन्हा १९...

दिलासादायक” नांदेडात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला, गुरुवारी पुन्हा १९ रूग्णांना सुट्टी, तर ५० जनांवर उपचार सुरु,अखेर देगलूर मध्ये आज कोरोनाने आपले खाते उघडलेच – नांदेड, दि 26 ; राजेश एन भांगे

392
0

दिलासादायक” नांदेडात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला, गुरुवारी पुन्हा १९ रूग्णांना सुट्टी, तर ५० जनांवर उपचार सुरु,अखेर देगलूर मध्ये आज कोरोनाने आपले खाते उघडलेच – नांदेड, दि 26 ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्ये बरोबरच, बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा तब्बल 19 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे, त्या मुळे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 267 वर पोहोचला आहे.

✔️नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोरोना रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

गुरुवार दिनांक 25 जून 2020 रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 19 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची एकूण संख्या 267 एवढी झाली आहे.

आज गुरुवार 25 जून रोजी प्राप्त झालेल्या 36 अहवालापैकी 31 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, तसेच 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 331 एवढी झाली आहे.

✔️आज प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये 2 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.

☑️विसावा नगर येथील 1 पुरुष वय : 17
☑️तसेच 3 रुग्ण चिखल भोसी ता. कंधार येथील आहे
◾️एक पुरुष वय : 26,
◾️दोन महिला रुग्ण वय : 19 व 26,

☑️देगलूर एक महिला रुग्ण वय : 59

आतापर्यंत 331 बाधितांपैकी 267 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 14 प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरीत 50 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 5 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 55 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 38, 65, व 75 वर्षाचे तीन पुरुष यांचा यात समावेश आहे. तर 3 बाधित व्यक्ती उपचारासाठी औरंगाबाद व 1 रुग्ण सोलापूर येथे संदर्भित करण्यात आले आहेत.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 5 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 331वर.
☑️ दिवसभरात 19 रुग्णांना सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 267 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️14 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️50 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 2 महिला 3 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ उपचारास्तव 2 रुग्ण औरंगाबाद 1 सोलापूर
येथे संदर्भीत.

रविवार 23 जून रोजी 122 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleमी तडजोड करणार नाही!…तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम! ✍️नागपूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) नागपूर:⭕ आयुक्त विश्वासात घेत नाहीत,
Next articleशिवसेनेपाठोपाठ आणखी एक मित्रपक्ष… भाजपची साथ सोडणार! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here