Home Breaking News चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’ चे आवाहन ; विशेष...

चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’ चे आवाहन ; विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

142
0

चीनी हॅकर्सच्या कोविड ईमेलपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’ चे आवाहन ; विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई दि.२४ – सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ मार्फत करण्यात येत आहे.

चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्लयामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा किंवाआर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की फ्री कोविड टेस्ट, फ्री कोविड-१९ किट (Free Covid Test, Free Covid-19Kit) त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाऊनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि वरील दाखविल्याप्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका.सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँटीव्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईलमधील अप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा,तुमच्या महत्त्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.खोट्या आणि प्रलोभने देणाऱ्या इमेल आणि वेबसाईटपासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्त्वाची माहिती जसे कि यूजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे.

………………………………..
माहिती व जनसंपर्क महा संचालनालय महाराष्ट्र शासन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here