नांदेड कोव्हिड १९ रूग्ण संख्या तिनशे च्या घरात, तर जिल्ह्यात गुरुवारी अजून १० रूग्णांची ची भर, १ ची सुट्टी
➖➖➖➖➖➖➖➖
नांदेड, दि.१८ ; राजेश एन भांगेh
➖➖➖➖➖➖➖➖
गुरुवार दिनांक 18 जून 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड कोविड केअर सेंटर येथील एक रुग्ण बरा झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुट्टी देण्यात आलेला आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 181 एवढी झाली आहे.
गुरुवारी 18 जून रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या एकूण 226 अहवालापैकी 198 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, व तसेच 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 296 एवढी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये, 5 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे.
सदरील रुग्ण हे खालील भागातील आहेत :
दि: 18/06/2020 वेळ 05.00 PM
गाव/गल्ली – संख्या – स्त्री/पुरुष – वय वर्ष.
☑️सोमेश कॉलोनी – 1 पु. 75
☑️परिमल नगर – 1 पु. 47
☑️चैतन्य नगर – 1 पु 43
☑️भगत सिंग रोड – 1 पु 24
☑️औरंगाबाद – 1 पु 33
———————————————————————–
☑️कामठा बु. – 2 स्त्री 19/22
☑️गजानन कॉलोनी तरोडा बु. – 1 स्त्री 42
☑️विठ्ठल मंदीर ता.मुखेड – 1 स्त्री 55
☑️कळमनुरी जि, हिंगोली – 1 स्त्री 55
असे एकूण आज रोजी 10 पॉझिटिव्ह रुग्णांची निदान झाले आहे.
आतापर्यंत 296 रुग्णांपैकी 181 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 102 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत. तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.
✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.
☑️ आज दिवसभरात 10 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 296 वर.
☑️ दिवसभरात एका रुग्णाला सुट्टी.
☑️ आत्तापर्यंत 181 बरे होऊन घरी .
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️13 कोरोना पॉसिटीव्ह.
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️102 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.
☑️ 5 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.
गुरुवार 18 जून 2020 रोजी 45 स्वॉब तपासणीसाठी पाटबविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 18/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित – 5441
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4948
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 2825
• अजून निरीक्षणाखाली असलेले – 299
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 130
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – 4818
• आज घेतलेले नमुने – 35
• एकुण नमुने तपासणी- 5514
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 296
• पैकी निगेटीव्ह – 4841
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 45
• नाकारण्यात आलेले नमुने – 91
• अनिर्णित अहवाल – 232
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 181
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145683 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!
दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.