Home Breaking News मोदींनी दिला चीनला थेट इशारा..आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम भारत हा शांतीपूर्ण...

मोदींनी दिला चीनला थेट इशारा..आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

169
0

🛑 मोदींनी दिला चीनला थेट इशारा..आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

  1. नवी दिल्लीः⭕ भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारतानं कधीच कोणावर आक्रमण केलेलं नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही गर्व असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. मोदींनी शहिदांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

आम्ही नेहमीच शेजाऱ्यांबरोबर को-ऑपरेटिव्ह आणि फ्रेंडली पद्धतीनं काम केलं आहे. नेहमीच त्यांच्या विकास आणि कल्याणाची इच्छा केली आहे.
जिथे मतभेद असतील तेसुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून मतभेद राहू नयेत. मतभेद वादामध्ये बदलू नये. आम्ही कधीच कोणाला उकसवलं नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. त्याग हे आमच्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे. त्याचबरोबर विक्रम आणि वीरतासुद्धा आमच्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणालाही छेडछाड करू देणार नाही, यासंदर्भात कोणालाही संभ्रम असण्याचं कारण नाही. भारताला शांती हवी आहे. पण जर भारताला संघर्षासाठी उकसवल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान, भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here