Home Breaking News कोरोनावर औषध मिळालं ! WHO ने…ब्रिटन सरकारचं केलं अभिनंदन ✍️ (...

कोरोनावर औषध मिळालं ! WHO ने…ब्रिटन सरकारचं केलं अभिनंदन ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

115
0

🛑 कोरोनावर औषध मिळालं !
WHO ने…ब्रिटन सरकारचं केलं अभिनंदन 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विदेश :⭕जगभरात कोरोना विषाणूवर लस, औषध शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर डेक्सॅमेथासोन हे औषध प्रभावी असल्याचा दावा ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेक्सॅमेथासोन औषधाच्या सुरुवातीच्या निकालांचे स्वागत केले आहे. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात डेक्सॅमेथासोन औषधाची चाचणी सुमारे २ हजार रुग्णांवर करण्यात आली. यावेळेस अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध यशस्वी ठरले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटन सरकारचे अभिनंदन केले आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, ‘कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलेलं डेक्सॅमेथासोन हे पहिले औषध आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेक्सॅमेथासोन या औषधाला ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे.’ प्रमुख संशोधक प्रो. मार्टिन लँड्रे म्हणाले की, ‘आता कोणताही उशीर न करता हॉस्पिटलमधील रुग्णांना हे औषध द्यावे. परंतु लोकांनी हे औषध स्वतः विकत घेऊन खाऊ नये.’

डेक्सॅमेथासोन औषध हे खास करून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्ट असणाऱ्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, ‘ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर असलेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणारे हे पहिलेच औषध आहे. ही खूप चांगली बातमी आहे. मी ब्रिटन सरकार आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इतर लोकांचे अभिनंदन करतो.’
या औषधाच्या चाचणी दरम्यान असे आढळले की, ‘व्हेंटिलेटरवर राहणाऱ्या रुग्णांना हे औषध दिल्यास मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी झाला आहे. तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनचा सपोर्ट असतो त्यांच्यामध्ये या औषधाच्या वापराने मृत्यूची शक्यता १/५ कमी झाली आहे.’ संशोधकांचा असा अंदाज आहे की, ‘ब्रिटनमध्ये हे औषध सुरुवातीला उपलब्ध असते तर ५ हजार लोकांचे प्राण वाचवू शकले असते. कारण हे औषध स्वस्त आहे.’…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here