🛑 योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!…मुंबईवरचा ‘”लोड'” कमी होणार 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
राज्यातून (बातमी ) :⭕कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात देशात अनेक राज्यातून मजुरांनी स्थलांतर केले. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक कामगार आणि मजूर आपापल्या गावी निघून गेल्याचे चित्र यला मिळाले. केंद्राने दिलेल्या आदेशानंतर या मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे विविध राज्यांमधून काढण्यात आल्या. दरम्यान, मुंबईसह राज्यात असलेल्या परप्रांतियांची रवानगी या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झाल्याचे सांगितले केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार मुंबईत वाढत चाललेल्या परप्रांतियांचा मुद्दा लावून धरला आहे. मुंबईत भूमीपुत्रांना कामे मिळावीत, त्याकरता हे लोंढे थांबवले जावे, असे राज ठाकरे नेहमीच आपल्या भाषणातून सांगत असत.
आता लॉकडाऊनच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेलेल्या मजुरांना तिथेच रोजगार मिळणार असून अखेर राज ठाकरेंच्या बोलण्याचा परिणाम उत्तर प्रदेश सरकारवर झाल्याचे यला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कामगार, मजुरांना राज्यातच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणी केली आहे. याकरता समिती नेमण्यात आली असून त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे…⭕