🛑 *भाजपा तर्फे वारजे परिसरात ३००० कुटुंबात आरोग्य किट वाटपाचा शुभारंभ* 🛑
✍️ पुणे( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे:⭕ *मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकार पर्व २.० वर्षपूर्ती निमित्ताने आणि*
*भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने*
*प्रभाग क्रमांक 31 वारजे कर्वेनगर येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशीलभाऊ मेंगडे, सौ. वृषालीताई चौधरी* यांच्या वतीने *कर्वेनगर भागात सुमारे १०,००० कुटुंबाला प्रत्येक घरी आरोग्य किट* वाटपानंतर , दुसर्या टप्प्यात वारजे भागातील सुमारे *३००० कुटुंबांना आरोग्य किट* देण्याचा शुभारंभ *मा. आ. भीमरावअण्णा तापकीर यांच्या हस्ते* श्रीराम सोसायटी गणपती ध्यान मंदिर येथे काल दि. १४ रोजी पार पडला, या आरोग्य किटमध्ये *३ लेअरचे ४ कापडी मास्क, सॅनिटायझरची बॉटल, केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या अर्सेनिक अल्बम -३० होमिओपॅथिक गोळ्यांची डबी असे या किटच्या स्वरूप आहे.*
त्याचबरोबर प्रभागांमध्ये *औषधाची फवारणी करून बिल्डिंग सॕनिटाईझ करण्यासाठी नगरसेविका सौ. वृषालीताई चौधरी यांच्या वतीने सनिटेशन पंपाचे देखील शुभारंभ* यावेळी करण्यात आला.
यावेळी *मा.आ. भीमराव तापकिर,नगरसेवक शिवराम मेंगडे,सुशिलभाऊ मेंगडे, दत्ताञय चौधरी, हेमंत बोरकर,डॉ खरे, विठ्ठल पासलकर, भाजपा पदाधिकारी, चिदानंद प्रतिष्ठान कार्यकर्ते सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते*,
यावेळी *श्रीराम सोसायटी, समर्थ, पश्चिम रंग, साई शिल्प, स्टर्लिंग ,गिरीश, पीएमटी, गोपाळ कृष्ण, आचार्य, स्वेदगंगा, गीतगंगा, तिरुपतीनगर, राजहंस, सुगम विश्व, आकाश नगर, अक्षय पॅलेस, ईशान्य नगरी, ईशान्य संस्कृती, चैतन्य नगरी, आणि परिसरातील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात आमदारांच्या हस्ते आरोग्य किटचे वाटप*⭕