• Home
  • पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडली

पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडली

🛑 पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडली 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिराच्या दरवाज्याच्या जाळ्या तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,शहरात रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी असूनही चोरट्यांचा मुक्त वावर रात्रीच्या वेळी असल्याचे घरफोड्यांच्या घटनांमुळे समोर आले आहे.
बुधवार पेठेमध्ये पासोड्या विठोबा मंदिर असलेला परिसर संपूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे पत्रे लावून हा भाग बंद करण्यात आला आहे. मात्र, बुधवार चौक ते मोती चौका दरम्यान सुरू असलेल्या रस्त्यानेच ही चोरी केल्याची शक्यता आहे.
पासोड्या विठोबा मंदिर हे शनिवारी रात्री बंद केल्यानंतर चोरट्यांनी दरवाजाच्या जाळ्या तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील दानपेट्या फोडून त्यातील रोकड लांबवून नेली. मंदिराचे पुजारी रविवारी सकाळी मंदिरात आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ फरासखाना पोलिसांत संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती परिसरात समजताच, नागरिकांनी मोठ्या प्रमाणा..⭕

anews Banner

Leave A Comment