• Home
  • लॉकडाऊनमुळे बंद असलेले नाट्यगृहांचे ‘पडदे’ पुन्हा उघडणार!

लॉकडाऊनमुळे बंद असलेले नाट्यगृहांचे ‘पडदे’ पुन्हा उघडणार!

🛑 लॉकडाऊनमुळे बंद असलेले नाट्यगृहांचे ‘पडदे’ पुन्हा उघडणार! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 जून : ⭕ देशभरात सुरू असलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा कहर सर्वत्र सुरू आहे. हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर देखील करण्यात आला होता. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. या दरम्यान मनोरंजन विश्वातील चित्रपट असो किंवा मालिका यांचे शुटिंग देखील बंद करण्यात आले होते. तसेच नाट्यगृह देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता प्रेक्षकांसह नाट्यकर्मींच्या सुरक्षेची काळजी घेऊन नाट्यगृहांचे ‘पडदे’ पुन्हा उघडण्यात येणार आहे.

नाट्यगृह सुरू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक आणि नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्ंयावर सविस्तर चर्चा व्हावी, या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक “झूम ऍप” द्वारे पार पडली. या बैठकीत २२ नाट्य निर्मात्यांनी आपली मते मांडली.

राज्यातील नाट्यगृह, प्रयोग सुरू करण्यापूर्वी करावयाच्या उपाय योजना, नाट्य व्यवसायापुढच्या अडचणी लक्षात घेऊन, काही पुढील निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती दिली.

➡️ महाराष्ट्रातील नाट्यगृहातील कोविड १९ च्या महामारीमुळे थांबलेले नाटकांचे प्रयोग “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ” आणि “अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे”च्या परवानगीशिवाय सुरु करता येणार नाही.

➡️ “मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ” आणि “अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे” या दोन्ही संस्थांच्या परवानगी पत्राशिवाय कोणत्याही नाट्यगृहाच्या तारखा नाट्य निर्मात्यांना दिल्या जाणार नाहीत.

➡️ नाटक सुरु करण्याआधी येणारा प्रेक्षक वर्ग, तंत्रज्ञ आणि कलाकार त्यांच्या कोरोना आजाराच्या संदर्भात त्यांच्या शारीरिक उपाययोजना काय असतील आणि त्या काय असायला पाहिजेत. यावर मान्यवरांचा सल्ला घेऊनच नाट्यगृहात प्रयोग सादर करावेत.

➡️ “ओटीटी प्लॅटफॉर्म”मध्ये १० जून २०२० नंतर कुठल्याही निर्मात्याने नवीन नाटक देऊ नये.

हे निर्णय नाट्य व्यवसायाच्या हिताचे असल्याने, त्यांचे पालन नाट्य निर्मात्याप्रमाणेच नाट्यगृहाशी संबंधित सर्व शासकीय व सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहेत.दरम्यान, वरील निर्णयाचे ठराव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, महानगरपालिका आयुक्त-मुंबई व पुणे; तसेच उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृह संबंधित शासकीय प्रमुख अधिकारी यांना देखील पाठवण्यात आले आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment