Home कोरोना ब्रेकिंग नांदेड येथे दिवस भरात ७ कोव्हिड रुग्णांची भर, तरआत्ता पर्यंत १२६ रूग्ण...

नांदेड येथे दिवस भरात ७ कोव्हिड रुग्णांची भर, तरआत्ता पर्यंत १२६ रूग्ण बरे होऊन घरी परतले

96
0

*नांदेड येथे दिवस भरात ७ कोव्हिड रुग्णांची भर, तरआत्ता पर्यंत १२६ रूग्ण बरे होऊन घरी परतले*
*नांदेड, दि ४ ; राजेश एन भांगे*
गुरुवार दिनांक 4 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 63 अहवाला पैकी 49 निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 7 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 182 एवढी झाली आहे
आज प्राप्त झालेल्या 7 पॉझिटिव रुग्णांपैकी 1 रुग्ण पुरुष वय वर्षे 43 राहणार औरंगाबाद आणि एक पुरुष वय वर्षे 74 राहणार तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील व इतर 5 रुग्ण हे नई आबादी शिवाजीनगर परिसरातील असून त्यापैकी एक रुग्ण पुरुष वय वर्ष 28 आणि 4 स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष अनुक्रमे 35, 45, 55, 70 असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे,

गुरुवार दिनांक 4 जून 2020 रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व मुंबई येथील संदर्भित रुग्ण पालकमंत्री अशोकराव चव्हाण असे दोन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे

व तसेच आतापर्यंत 182 रुग्णांपैकी 126 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 48 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्ण ज्यात 2 स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 व 65 आणि एक पुरुष ज्याचे वय 38 वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे

बुधवार दिनांक 3 जून 2020 रोजी प्रलंबित असलेल्या 111 स्वॉब तपासणी अहवालापैकी 63 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 48 अहवालांचा रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल, व दिनांक 4 जून 2020 रोजी 25 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील. असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 7 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ दिवसभरात नांदेडातील1 व मुंबई येथील 1 संदर्भीत अश्या 2 रुग्णांना सुट्टी.

☑️ एकूण पॉसिटीव्ह रुग्ण संख्या 182 वर.

☑️ आत्तापर्यंत 126 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️एकूण 48 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 2 महिला व एका पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Previous articleदेगलूर नगर परिषदे मार्फत पुर्वी केलेल्या सीसी रोडवर करण्यात आले डांबरी रोड
Next articleहातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here