🛑 खूशखबर : ‘या’ देशात कोरोनावर मात करणारी लस विकसित 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई : ⭕ संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अचानक आलेल्या संकटाने आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. या धोकादायक आजारावर मात करण्यासाठी सर्वच राष्ट्र प्रभावी औषधाच्या शोधात आहे. रशियाने या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही नवी लस लवकरच रुग्णांच्या उपाचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य यंत्रणेने दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे रशिया सकरकार ही लस वापरण्यास मंजुरी दिली आहे.
रशियाने विकसित केलेल्या या लसीला ‘एव्हिफेव्हीर’ असं नाव देण्यात आलं आहे, तर ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल लसीने उपचार सुरु होणार आहेत. ही लस विकसित करणारी कंपनी दर महिन्याला तब्बल ६० हजार रूग्णांवर उपचार करेल अशाप्रमाणात लसीचं उत्पादन करणार आहे.
‘एव्हिफेव्हीर’ हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. एका जापानी कंपनीने या लसीची निर्मिती १०९० साली केली होती. जपानमध्ये ही लस ताप, सर्दी झालेल्या रुग्णांना देण्यात येते. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एव्हिगन या ब्रॅण्डनेमअंतर्गत फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते.
‘एव्हिफेव्हीर’ लसीवर काही प्रक्रिया करून शिवाय त्यामधील रोगप्रतिकाशक्ती वाढवण्याचा प्रयत्न रशियन शास्त्रज्ञांनी केले आहे. रशियाकडून विकसित करण्यात आलेल्या लसीची माहिती काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात यईल असं वक्तव्य आरडीआयएफच्या प्रमुखांनी केलं आहे. शिवाय त्यांनी अवघ्या चार दिवसांत रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा दावा केला आहे. ⭕
