Home Breaking News लाँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक! उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम !

लाँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक! उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम !

445

 

⭕लँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक! उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम !⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई -: लॉकडाउनमुळे मीटरचे रीडिंग शक्य नसल्याने सरासरी पद्धतीने तयार केलेली बिले ग्राहकांना एसएमएमसने पाठविली जात आहेत. लॉकडाउननंतर मात्र मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्यावर उन्हाळ्यातील वाढीव वीज वापर नोंदविला जाईल. त्यानंतर हाती पडणारी बिले अनेकांना पावसाळ्यातही घाम फोडणारी असतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे वीज बिलांचे रीडिंग घेणे महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या वीज वितरण कंपन्यांना शक्य नव्हते.
त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार, गेल्या चार महिन्यांतील वीज बिलांची सरासरी रक्कम काढून मासिक बिल ग्राहकांना देण्यात आले. हेच सूत्र एप्रिल, मे महिन्यासाठी वापरण्यात आले. मीटर रीडिंगचा फोटो काढून पाठवा या आवाहनाला जेमतेम ५ टक्के ग्राहकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील सुमारे १ कोटी ८० लाख घरगुती ग्राहकांना सरासरी पद्धतीनेच आकारणी झाली.

तापमानात वाढीमुळे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यांत घरगुती वीज वापर साधारणत: २५ ते ३५ टक्क्यांनी वाढतो. बहुसंख्य घरगुती ग्राहक ० ते १०० युनिट या स्लॅबमधील आहेत. परंतु, उन्हाळ्यात ते १०० ते २०० युनिटच्या टप्प्यात जातात. या ग्राहकांना वाढीव दराने आकारणी होत असल्याने या महिन्यांतील बिलांची रक्कम कायमच जास्त असते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त असल्याने विजेच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांतील त्यांच्याकडून करण्यात आलेला वीज वापर हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात त्यांनी केलेज्या वापरापेक्षा किमान दीडपटीने जास्त असेल, अशी माहिती वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.

बिलांची रक्कम होणार दुप्पट
एप्रिल, मे या दोन्ही महिन्यांत ग्राहकांना सरासरी बिले गेल्यामुळे वाढीव वीज वापराच्या नोंदी वितरण कंपन्यांकडे नाहीत. जूनमध्ये या नोंदी घेऊन बिल पाठवण्याचे नियोजन आहे. शिवाय वीज नियामक आयोगाने ५ ते ७ टक्के दरवाढही १ एप्रिलपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांतील तफावत एकाच बिलात समाविष्ट करून दिल्यास बिलांची रक्कम काही ठिकाणी दुप्पटही होईल, अशी दाट शक्यता आहे.

Previous articleलाँकडाऊन मधे नोकरी गेलेल्याने उत्पन्न थांबले ! या टिप्स नक्कि वाचा
Next articleकोरोनाबाधित ५२ हजार ६६७ ,आता पर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.