*पुणे ४आँगस्ट (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)*
पुणे काराग्रह उप अधिक्षकास खानदान संपविण्याची धमकी
ससून रुग्णालयात ड्युटी लावल्याने कारागृहातील कर्मचार्याने अधिकाऱ्याला खानदान संपवण्याची धमकी दिली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चंद्रमणी अर्जुनची इंदुरकर. (५५ रा. शासकीय वसाहत येरवडा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कर्मचारी जयकुमार सोमनाथ शिंदे (३९:रा. शासकीय कर्मचारी निवासस्थान) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे येरवडा कारागृहात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या कारागृहातील प्रकाश फाले यास ससून रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी शिंदे ला ससून रुग्णालयात रात्रपाळीत ड्युटी.
जाण्याचे पत्राद्वारे आदेश दिले होते हाच राग मनात धरून शिंदे याने अधीक्षकांच्या केबिन मध्ये जाऊन फिर्यादी ना दररोज मला ससून मध्ये ड्युटी करण्यास सांगतोस तुझा आदेश जरी असेल तरीही मी ससून रुग्णालयात जाणार नाही असे सांगून मला जर ससूनमध्ये पाठवलास तर तुझे खानदान मी संपवून टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे हे करीत आहेत ्