• Home
  • माजी कृषीमंत्र्याना कुरूंदवाड कृती* *समितीच्या वतीने निवेदन.*

माजी कृषीमंत्र्याना कुरूंदवाड कृती* *समितीच्या वतीने निवेदन.*

*माजी कृषीमंत्र्याना कुरूंदवाड कृती* *समितीच्या वतीने निवेदन.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्यूज)*

आज मंगळवारदि.४आँगस्ट रोजी एसटी कर्मचारी कृती समिती कुरूंदवाड आगाराच्या वतिने हातकणंले बस स्थानकामधे माजी कृषी मंत्री , आमदार श्री सदाभाऊ खोत. यांना एस.टी.शासनात विलीनिकरण ह्वावे व एस.टी.कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या अडीच महिन्यापासुन मिळालेला नाही
तो वेळेत ह्वावा ,तसेच इतरांपेक्षा कमी पगारामुळे एस.टी.कर्मचारी अधिकच कर्जाच्या खाईमधे गुरफटला असुन अनेकांनी आत्महत्या हा ही पर्याय निवडला असुन यावर सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे .
ए.टी. कर्मचाऱ्यांना वेतन न मिळालेने
दोनवेळचे जेवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आघाडी सरकारने निवडणुकीपुर्वी वचननाम्यात एस.टी.शासनात घेऊ असे जाहीर केलं होत.अशी पोकळ आश्वासने देऊन एस.टी.कामगारांची दिशाभुल केली आहे.
काही जाचक परिपत्रके कामगारांच्यावर लादली जात आहे.
पन्नास वर्षावरील कामगारांना स्वेच्छा निवृत्ती सक्तीची केली जात आहे.
मालवाहतुक बसवर काम करणाऱ्या चालकासोबत सहाय्यक अथवा दुसरा चालक देणेत यावा .
यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून संघटना विरहीत महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कृती समिती स्थापण करून समितीच्या च्या माध्यमातून राज्यातून , जिल्हातून मंत्र्यांना खासदार , आमदारांना निवेदन दिली जात आहेत.
तरी सुद्धा सरकार जाणिव पुर्वक लक्ष घालत नाही.
आज राज्याचे माजीकृषी मंत्री ,आमदार श्री सदाभाऊ खोत यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड आगार कृतिसमीतीच्या वतीने विविध प्रश्नांबाबत , विविध मागण्याबाबत हातकणंगले बसस्थानकामधे निवेदन देण्यात आले.
यावेळी कुरूंदवाड आगार कृती समितिचे अध्यक्ष श्री अरूण वास्कर , उपाध्यक्ष श्री किशोर शिंगाडे , गणेश शरमाळे , किशोर शिंगाडे,
इद्रंजीत काने , दिलीप कलगुटगे ,
रवि भोसले , निनाद भोसले,
इचलकरंजी आगार हातकणंगले बसस्थानकचे वाहतूक निरीक्षक श्री आर.पी.कोळी. वाहक श्री एस.एफ.शेख.
इत्यादी कर्मचारीबंधूच्या उपस्थित निवेदन देण्यात आले .

anews Banner

Leave A Comment