*युवा मराठा न्युजचा नावलौकिक* *लोकचळवळीचे स्वरुप झाले प्राप्त…*
*वाचक मित्रांनो,*
*युवा मराठा न्युज चँनल अँन्ड प्रिंन्टमिडीयाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर घोंगावत असून,आजमितीस युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे नंबर १चे लोकप्रिय चँनल म्हणून नावारुपास आले आहे.आज युवा मराठा न्युजला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.सर्वत्र युवा मराठा न्युजच्या कर्तृत्वाचा गाजावाजा होत असताना बोलबाला होत असताना बघून निश्चितच अभिमानाने छाती फुगून येते*
*तस बघितलं तर युवा मराठाकार राजेंद्र पाटील राऊत हे एक जिद्दी व अभ्यासू पत्रकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत.त्यांनी अत्यंत हलाखीच्या व वाईट परिस्थितीत पत्रकारितेला सुरुवात केलेली आहे.ज्यावेळेस ट्रेड्रल मशिनवर वृतपत्र छपाई व्हायचे त्याकाळात त्यांनी कौळाणेसारख्या ग्रामीण भागातून पत्रकार म्हणून कार्याचा श्रीगणेशा केला.जिल्हास्तरावरील राज्यस्तरावरील विविध वृतपत्रांमध्ये पत्रकार म्हणून कार्य पार पाडीत असतानाच त्यांनी येथील अनुभवी आँखे सारख्या हिंदी न्युज चँनलमध्येही राष्ट्रीय पातळीवर व्यशस्वीरित्या पत्रकारिता केली.युवा मराठा हे वृतपत्र सन २००३ साली सुरु करुन बहुजन समाजाच्या चळवळीला समर्पित केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर व संकल्पनेवर चालणाऱ्या युवा मराठा वृतपत्रात देखील अठरा पगड जातीधर्माचे व बारा बलुतेदार असलेले सर्व मिळून एक परिवार निर्माण झाला आहे.युवा मराठा आँनलाईन वेब न्युज चँनलची सुरुवात हि राजेंद्र पाटील राऊत यांनी एकट्याने केली.आज संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मराठा परिवाराचे जाळे विणले गेले आहे.विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा मराठा सदैव चर्चतच राहिलेला आहे.”एवढासा वेलू लावला दारी,त्याने घेतली उंचभरारी”असेच युवा मराठा परिवाराबाबत सांगावे लागेल.त्याशिवाय युवा मराठा परिवारातील प्रत्येक प्रतिनिधी पत्रकार आपला कुटूंबातीलच सदस्य असल्याचे समजून राजेंद्र पाटील राऊत प्रत्येकाच्या अडीअडचणीत सुख दुःखात प्रत्यक्ष धावून जातात.व त्यांनी स्वतः अनुभवलेले दुःख हे इतरांच्या वाटयाला येऊ नये म्हणून ते सदैव कार्यरत असतात.अगदी अल्पशा काळात युवा मराठा न्युजने केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे.साल्हेर येथे सुरु असलेले विभागीय कार्यालयाचे बांधकाम, त्याशिवाय मालेगाव शहरात असलेले कार्यालय,आणि लवकरच सुरु होत असलेले ग्रामीण विभागीय कार्यालय,आणि कौळाणेतील नियोजीत पत्रकार भवन या प्रस्तावीत इमारतीचे देखील लवकरच बांधकाम सुरु होईल.अशा पध्दतीने अल्पावधीत युवा मराठा न्युजने नावलौकिक साधण्याबरोबरच एक लोकचळवळ म्हणून युवा मराठा न्युजच्या कार्याला गती प्राप्त करुन दिलेली आहे*
*सुभाष कचवे सिनीयर रिपोर्टर युवा मराठा न्युज महाराष्ट्र*