Home Breaking News *जिल्ह्यातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार* *- महिला व बालविकास मंत्री अँड.यशोमती...

*जिल्ह्यातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार* *- महिला व बालविकास मंत्री अँड.यशोमती ठाकुर*

212

*जिल्ह्यातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार*

*- महिला व बालविकास मंत्री अँड.यशोमती ठाकुर*

पालघर दि 20 :नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणा चा प्रश्न सोडवायचा असून ,या पार्श्वभूमीवर पालघर मध्ये विविध योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. , शासकीय सुविधा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविन्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असून या सर्व बाबीचा तसेच करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा आढावा घेण्यात आला असून जिल्ह्यातील समस्या या प्राधान्याने सोडविल्या जाणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी केले.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांचा पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे महिला व बालविकास विभागाचा आढावा तसेच कोरोना संदर्भात करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या.
यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण, घरगुती हिंसाचार,मुले पळवण्याचे, पळून जाण्याचे प्रमाण, बालविवाह , कुमारिका अल्पवयीन माता,संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक,मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध सुविधा ,यावर आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.जिल्ह्यात महिला व बालविकास सोबत काम करणाऱ्या एनजीओ, त्यांचे उपक्रम यावर विस्तृत आढावा घेतला.
महिला व बालविकास विभागाच्या सचिव, श्रीमती आय.ए. कुंदन,
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या आयुक्त इंद्रा मालो,
महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपआयुक्त राहुल मोरे यांनी जिल्ह्यात महिला व बालविकास सोबत काम करणाऱ्या एनजीओ, त्यांचे उपक्रम यावर विस्तृत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी कोव्हीड19 सद्यस्थिति बाबत व जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना या बाबत सविस्तर माहिती मंत्री श्रीमती ठाकूर यांना दिली.
यावेळी खा. राजेंद्र गावित,आ.श्रीनिवास वणगा, जि. प. अध्यक्ष भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे ,महिला व बालविकास सभापती अनुश्री ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव, श्रीमती आय.ए. कुंदन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभूवन, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या आयुक्त इंद्रा मालो,
महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपआयुक्त राहुल मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे ,महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Previous articleपुणे २२ जुलै🥃🥃⭕ ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕🥃🥃
Next articleशिवसेनेच्या महीला नेत्या प्रिंयाका चतुर्वेदीनी घेतली मराठीत शपथ.*  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.