🛑 भगवान श्री राम करणार!चीनी ड्रॅगन चा वध…पोस्ट होतीय जगभरात व्हायरल 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
⭕ भारत आणि चीन सीमेवर झालेल्या सैनिकांमधील हिंसक संघर्ष वाढता आहे अशातच सोशल मीडिया वर एक पोस्ट अनेक देशांमध्ये व्हायरल होत आहे, तायवानच्या एका दैनिकाने हे चित्र छापले सुद्धा आहे. या चित्रात भगवान राम हे चिनी ड्रॅगनचा वध करतांना दिसतात.
दरम्यान परदेशी माध्यमांनी वाढत्या संघर्षावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक्सप्रेस डॉट यूके जिथे यास तिसरे महायुद्ध सुरू होण्याचे सांगत आहे. त्याच वेळी, इस्त्रायल टाइम्सच्या मते वाढीव तणावामुळे उद्भवणारा हा संघर्ष आहे. न्यूयॉर्क टाइम्सने त्याला दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील संघर्ष म्हटले आहे.
पूर्वेकडील लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) भारत आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे तीन सैनिक शहीद झाले आहेत आणि बरेच चिनी सैनिक मारले गेले आहेत.⭕