• Home
  • डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे १९ जून :⭕ डेटिंग साइटवर ओळख झालेल्या तरुणाने उंड्री परिसरातील एका तरुणीची लग्नाच्या आमिषाने ९३ हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१९ ते मे २०२० कालावधीत उंड्रीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. तरुणीने डेटिंग साइटवर नावनोंदणी केली होती. त्या ठिकाणी आरोपीसोबत तरुणीची ओळख झाली. त्या तरुणाने तरुणीला संपर्क करून ओळख वाढविली. त्यानंतर विविध कारणे सांगून तिच्याकडून ऑनलाइन माध्यमातून ९३ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment