Home Breaking News सातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी...

सातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

489

🛑 सातारा जिल्ह्यात सात नवे पाँझिटिव्ह 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा ⭕ – जिल्ह्यातील सात जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७७३ झाली आहे.

बुधवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार पुण्यातील एन. सी. सी. एस. येथे तपासणी करण्यात आलेल्या ७ नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यापैकी तिघांचा रिपोर्ट मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

या सात जणांमध्ये कोरेगाव तालुक्यातील चोरगेवाडी येथील २७ वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील १४ वर्षाची मुलगी, सातारा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ५६ वर्षीय महिला, वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील ९ वर्षाची बालिका, पाटण तालुक्यातील मूळ गोवारे येथील १४ जून रोजी मुंबई येथून आलेला ५० वर्षीय पुरुष गावच्या शाळेतील विलगीकरणात असताना १६ जून रोजी अचानक मृत पावला होता, हावळेवाडी ( बहुले ) येथे १४ जून रोजी ४५ वर्षीय महिला मानखुर्द मुंबई येथून आली होती आणि घरातच विलगीकरणात मृत्यू पावली होती.
जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, १२ जून रोजी मुंबईवरून आला होता. १६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटलला आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला. अशा एकूण तिघांचा रिपोर्ट मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले…⭕

Previous articleनांदेड जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवीन बाधित रूग्ण नाही नांदेड : राजेश एन भांगे
Next articleभंडारा जिल्ह्यात आज ५ नवे रुग्ण कोरोना बाधित सापडले 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.