Home पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन ६ जणांचा मृत्यू; बारामती विमानतळावर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन ६ जणांचा मृत्यू; बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान घडली घटना

456

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

६ जणांचा मृत्यू; बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान घडली घटना

बारामती/ पुणे, उमेश पाटील प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला. यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Previous articleYuva maratha Epaper 25 January 2026
Next articleयुवा मराठा विशेष न्युज पेपर : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.