Home गडचिरोली कर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा — शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा...

कर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा — शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश, संघटनाला नवी ऊर्जा

193

आशाताई बच्छाव

1002160767.jpg

कर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा — शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश, संघटनाला नवी ऊर्जा

गडचिरोली | सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोलीतील कर्तव्य कक्ष क्रमांक एक येथे आज भारतीय जनता पक्षाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात श्री. शुभमजी बाळेकरमकर, श्री. रविजी कांबळे, आणि श्री. विजयजी बारापात्रे यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त केला.

या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भाजप संघटन अधिक बळकट झाले असून, नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे विकासाच्या वाटचालीला नवी ऊर्जा आणि जोम मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आमदार डॉ. मिंलिदजी नरोटे यांच्या हस्ते नवीन कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात स्वागत करून पक्षाचा ध्वज आणि शाल प्रदान करण्यात आली. डॉ. नरोटे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की,

> “भारतीय जनता पक्ष हा विकास, पारदर्शकता आणि राष्ट्रहिताचा पक्ष आहे. पक्षात नव्याने दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवावी, हीच खरी सेवा आहे.”

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते होते. यावेळी शहराध्यक्ष श्री. अनिलजी कुनघाडकर, तालुकाध्यक्ष श्री. दत्तूजी सूत्रपवार, तसेच जेष्ठ नेते श्री. सुधाकरजी येनगंधालवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपच्या कार्याचा विस्तार गडचिरोली जिल्ह्यात अधिक जोमाने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.