Home गडचिरोली माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांची गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी निवडणूक...

माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांची गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती — कार्यकर्त्यांत आनंदाचा उत्साह

130

आशाताई बच्छाव

1002163441.jpg

माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांची गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती — कार्यकर्त्यांत आनंदाचा उत्साह

 गडचिरोली | सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून प्रशांत भाऊंचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

पक्ष संघटनातील दीर्घ अनुभव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. वाघरे यांनी जिल्हाध्यक्ष पदावर असताना पक्षाच्या विस्तारासह सामाजिक कार्यातही भक्कम भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत पक्ष अधिक सक्षमपणे लढणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल आमदार डॉ. मिंलिदजी नरोटे, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते,माजी आमदार देवरावजी होळी जिल्हा आणि शहर पदाधिकारी, तसेच सर्व कार्यकर्त्यांनी प्रशांत भाऊ वाघरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

> “पक्षाने दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असून, पक्षाच्या धोरणे व विचारधारेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,” असे प्रशांत भाऊ वाघरे यांनी यावेळी सांगितले.

 

गडचिरोली भाजपा संघटनेत या नियुक्तीमुळे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत भाजपा विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.