Home उतर महाराष्ट्र ख्रिस्ती समाजभवनासाठी जागा द्यावी व मदर तेरेसांचा पुतळा उभारावा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती...

ख्रिस्ती समाजभवनासाठी जागा द्यावी व मदर तेरेसांचा पुतळा उभारावा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेची ना.विखे पाटलांकडे मागणी

208

आशाताई बच्छाव

1002160737.jpg

ख्रिस्ती समाजभवनासाठी जागा द्यावी
व मदर तेरेसांचा पुतळा उभारावा
महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेची ना.विखे पाटलांकडे मागणी
श्रीरामपूर ( दिपक कदम तालुका प्रतिनिधी) ः श्रीरामपूर शहरात मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाचे वास्तव्य आहे. हा समाजाचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. मात्र, समाजासाठी समाजभवनाला जागा नाही. नगरपालिकेने ख्रिस्ती समाजमंदिरासाठी जागा द्यावी तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला संत मदर तेरसा यांचा पुतळा संतलूक हॉस्पिटल परिसरात बसवावा, अशी मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, शहरात ख्रिस्ती समाजाचे सुमारे हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. या सर्व नागरिकांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक जागरूकतेसाठी विविध कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात. मात्र, सद्यस्थितीत ख्रिस्ती समाजाकडे कोणतेही स्वतंत्र समाजभवन किंवा सामुदायिक सभागृह उपलब्ध नाही. सामाजिक ऐक्य, शिक्षणवृद्धी, युवक व महिला सक्षमीकरण तसेच समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक व प्रशिक्षण उपक्रम राबविण्याकरिता स्वतंत्र समाजभवनाची अत्यंत गरज भासत आहे. श्रीरामपूर शहरात शासनाच्या जागेवर किंवा नगरपरिषदेच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजभवन उभारण्यासाठी जागा व निधी मंजूर करावी.
या समाजभवनातून सर्व ख्रिस्ती बांधवांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी मोठी मदत होईल व समाजातील एकोपा अधिक वृद्धिंगत होईल.तसेच श्रीरामपूर शहरातील संत लूक हॉस्पिटल परिसरामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न संत मदर तेरेसा यांचा पुतळा बसविण्यात यावा ही नम्रपूर्वक विनंती.
राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले व जिल्हाध्यक्ष दिपक कदम, पास्टर राजेश कर्डक पास्टर, सतीश आल्हाट, रवींद्र लोंढे, लेविन भोसले, संजय दुशिंग, संतोष गायकवाड, कमलाकर पंडित, विलास पठारे, प्रमोद शिंदे, विश्वरंजन मकासरे, व्ही. एस. कांबळे, संजय तोरणे, प्रकाश निकाळे, अजित सुडगे, निशिकांत पंडित, विश्वास अमोलिक, विकी त्रिभुवन, संदीप हिवाळे, विजय त्रिभुवन, संदीप साळवे, राजू साळवे, जेम्स पंडित, सुरेश ठुबे, राजकुमार सात्रळकर, संदिप दळवी, किशोर गायकवाड, भाऊसाहेब तोरणे, चंद्रकांत त्रिभुवन, संजय साळवे, सचिन रूपटक्के, लुकस दिवे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Previous articleदीपावली स्नेहमिलन कार्यक्रम उपस्थिती !     
Next articleकर्तव्य कक्ष क्रमांक १ येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा — शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश, संघटनाला नवी ऊर्जा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.