Home बुलढाणा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एलसीबीची धडाकेबाज कारवाई; दोन देशी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे...

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एलसीबीची धडाकेबाज कारवाई; दोन देशी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त

149

आशाताई बच्छाव

1002157310.jpg

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एलसीबीची धडाकेबाज कारवाई;
दोन देशी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त

✍🏻स्वप्निल देशमुख
संग्रामपूर :-जिल्ह्यात सुरू असलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्यावर लगाम घालण्याच्या उद्देशाने एलसीबी पथकाने धडाकेबाज कारवाई करत दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) व श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली. पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार 4 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरवट बकाल परिसरात संशयित हालचाली दिसताच पथकाने दबा धरून छापा मारला. त्यात
पवन वासुदेव कोकाटे (वय 34, रा. नांदेड) हा आरोपी आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे असा अंदाजे ₹84,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम 3, 25 सहकलम 123, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाही पथक :
▶️ PSI पंकज सपकाळे
▶️ हवालदार एजाज खान
▶️ पोलीस नाईक अमोल शेजोळे
▶️ पोलीस नाईक अजीस परसुवाले
▶️ डीपीसी शिवानंद हेलगे

एलसीबीच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्रधारींना मोठा चाप बसला असून पुढील तपास तामगाव पोलिसांत सुरू आहे.

Previous articleजनतेच्या मनातील नेतृत्व — प्रा. राजुभाऊ कात्रटवार (माजी गटनेते, बांधकाम सभापती – नगर परिषद गडचिरोली)
Next articleभाजपाकडून वालसावंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास शिल्पा गणेश दामधर इच्छुक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.