आशाताई बच्छाव
जनतेच्या मनातील नेतृत्व — प्रा. राजुभाऊ कात्रटवार
(माजी गटनेते, बांधकाम सभापती – नगर परिषद गडचिरोली)
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ- नगरपरिषदेची निवडणूक जवळ येत असताना शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध इच्छुकांनी आपापली उमेदवारी जाहीर केली असून, शहर विकासाच्या नव्या दिशेचा आराखडा मांडण्यास सर्वच जण उत्सुक आहेत. अशा या राजकीय गजबजलेल्या काळात, जनसामान्यांच्या मनामनात विश्वास, तळमळ आणि आशेचं प्रतीक म्हणून उदयास आलेलं नाव म्हणजे प्रा. राजुभाऊ कात्रटवार.
राजुभाऊ हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नाही, तर ते सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि विकासाची तळमळ असलेले खरे समाजसेवक आहेत. नगरपरिषदेतील बांधकाम सभापती म्हणून काम करताना त्यांनी पारदर्शक प्रशासन, वेगवान निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख कारभार यांचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.
शहरातील सर्वसामान्य माणसाचं काम तातडीने, सुलभ पद्धतीने कसं पूर्ण होईल — यासाठी राजुभाऊ नेहमीच तत्पर असतात.
त्यांचं नेतृत्व हे केवळ पदापुरतं मर्यादित नसून, जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारं, संकटात धावून जाणारं आणि “माणुसकी” जपणारं नेतृत्व आहे.
राजुभाऊ कात्रटवार हे उच्च शिक्षित, अभ्यासू, दुरदृष्टी असलेले आणि जनतेच्या हितासाठी नेहमी पुढे असणारे दमदार नेते म्हणून आज गडचिरोलीत ओळखले जातात. त्यांचा जनाधार हा पक्षभेदांच्या पलिकडचा आहे, कारण ते प्रत्येक माणसात माणूस पाहतात, मतदारात मत नाही.
आज गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे जी “देणं” जाणते. आणि राजुभाऊ कात्रटवार हे त्या देणाऱ्या हातांचं जिवंत प्रतीक आहेत.
राजकीय मतभेद विसरून, एकदिलाने आणि एका मताने जर जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली, तर गडचिरोली शहर विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करेल, यात शंका नाही.
जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेंत म्हणतात —
“पुढारी पण कशाला, सेवा गावाची करावयाला,
सेवेची कसोटी लावा की, पुढारी समजेल आपला तो.”
हीच कसोटी लावून विचार केला, तर उत्तर स्पष्ट आहे —
गडचिरोलीच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी – योग्य नेतृत्व म्हणजे प्रा. राजुभाऊ कात्रटवार.
—
“सेवेचं व्रत, विकासाची दिशा आणि जनतेचं हित – हेच आमचं ध्येय!”
— तुमचा विश्वास आणि आशीर्वाद हेच माझं बळ
– प्रा. राजुभाऊ कात्रटवार
—






