आशाताई बच्छाव
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर एलसीबीची धडाकेबाज कारवाई;
दोन देशी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त
✍🏻स्वप्निल देशमुख
संग्रामपूर :-जिल्ह्यात सुरू असलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्यावर लगाम घालण्याच्या उद्देशाने एलसीबी पथकाने धडाकेबाज कारवाई करत दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) व श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली. पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार 4 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरवट बकाल परिसरात संशयित हालचाली दिसताच पथकाने दबा धरून छापा मारला. त्यात
पवन वासुदेव कोकाटे (वय 34, रा. नांदेड) हा आरोपी आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे असा अंदाजे ₹84,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम 3, 25 सहकलम 123, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाही पथक :
▶️ PSI पंकज सपकाळे
▶️ हवालदार एजाज खान
▶️ पोलीस नाईक अमोल शेजोळे
▶️ पोलीस नाईक अजीस परसुवाले
▶️ डीपीसी शिवानंद हेलगे
एलसीबीच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्रधारींना मोठा चाप बसला असून पुढील तपास तामगाव पोलिसांत सुरू आहे.






