Home जालना जवखेडा (ठेंग) पंचायत समिती गण मधून विलास पाटील इंगळे यांच्या पत्नी सौ.अनिताताई...

जवखेडा (ठेंग) पंचायत समिती गण मधून विलास पाटील इंगळे यांच्या पत्नी सौ.अनिताताई इंगळे निवडणूक लढण्यास इच्छुक…

246

आशाताई बच्छाव

1002156265.jpg

जवखेडा (ठेंग) पंचायत समिती गण मधून विलास पाटील इंगळे यांच्या पत्नी सौ.अनिताताई इंगळे निवडणूक लढण्यास इच्छुक…
या पूर्वी युद्धभूमी आसईच्या राहिल्या धडाकेबाज सरपंच ..
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भारतीय जनता पार्टी मा केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे (दादा )व पंचायतराज कमेटी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार श्री संतोष पाटील दानवे (भाऊ) यांचे विश्वासू खंदे समर्थक मानले जाणारे श्री विलास पाटील इंगळे भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष तथा मा.सरपंच तथा सदस्य: संजय गांधी /श्रावण बाळ /विधवा /अपंग ,निराधार पेंशन अनुदान योजना तहसील कार्यालय,जाफराबाद यांच्या पत्नी सौ. अनिताताई विलासराव इंगळे ह्या पक्षाने संधी दिल्यास जवखेडा (ठेंग) हे महिला सर्वसाधारण प्रवर्गातून सुटले असल्याने पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, त्यांच्या आसई गावातून तसेच सर्कल मधील जनतेतून त्यांच्या नावाला जोरदार चर्चाला उधाण आले आहे.
या पूर्वी युद्धभूमी आसई गावच्या सरपंच पदाची धुरा त्यांनी मा. श्री रावसाहेब पाटील दानवे दादा व आमदार श्री संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेले आहे ,त्यामध्ये गावातील युद्धभूमी स्थळी शिलाजीत दगडात कोरीव माहिती फलागचे काम असेल ,जुई नदीवरील पूल असेल , जल जीवन योजना, पाण्याची टाकी गावामध्ये नळ योजना, गल्ली तेथे काँग्रेटीकरण, हायलाँप , घरकुल,शेजारच्या गावाला जाणारे कच्चे रस्ते ,सह विविध योजना गावामध्ये राबविल्या असल्याने त्यांचे नाव पंचकृषीमध्ये धडाकेबाज सरपंच म्हणून चर्चेत राहीलेले आहे.

विलास पाटील इंगळे यांची माहोरा येथे नावाजलेली शैक्षणिक शिक्षण संस्था आहे ज्यामध्ये विशेषतः हा मुलींना विविध योजना अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते, तसेच संस्था अंतर्गत दादा आणि भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुकास्थरीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते ,त्यामध्ये परिसरातील गरजूंना मोफत अत्यआवश्यक मेडिकल वाटप करणे,रक्त तपासणी ,तसेच 100 पेक्षा जास्त विशेष तज्ज्ञ डॉ. यांच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत मोफत ऑपरेशन मार्गदर्शन केले जाते, अश्या विविध सामाजिक व जनहितार्थ कार्याच्या माध्यमातून सर्कल मधे त्यांचा जनतेसोबत जिव्हाळ्याचा व आपुलकीचा दांडगा जनसंपर्क राहत आला आहे , तसेच विलास पाटील इंगळे यांना दादा आणि भाऊ यांचे विश्वासू मानले जाते म्हणूनच महाराष्ट्र शासनाची ग्रामीण भागात महत्वाची मानली जाणारी कमेटी जिथे तळागाळात काम करण्याची संधी मिळते ती – संजय गांधी /श्रावण बाळ / विधवा अपंग ,निराधार अनुदान पेन्शन योजना , ज्याचा फायदा गरजू असलेले वृद्ध, विधवा अपंग यांच्या साठी महत्वाचा मानला जातो अशी लाभ मिळून देणारी योजना या कमेटीवर दादा आणि भाऊ यांच्या माध्यमातून श्री विलास पाटील इंगळे यांची माहोरा/ जवखेडा (ठेंग) सर्कल मधून निवड करण्यात आलेली आहे ,या निमित्ताने सर्कल मधील गरजू तसेच तळागाळा पर्यंत पोहचून तालुक्यामधील श्री आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या मार्गदर्शनाने श्री विलासराव यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ सर्कल मध्ये गरजूंना मिळवून देण्याचे काम करता आले,या मुळे सर्कल मध्ये त्यांचे नाव आपुलकीने घेतले जाते

म्हणूनच जवखेडा (ठेंग) पंचायत समिती गणामधून भाजपा पक्षाकडून सौ.अनिताताई विलासराव इंगळे यांनीच निवडणूक रिंगणात उतरावे या मागणीसाठी मतदार राज्या जोर धरत आहे.
सौ. अनिताताई इंगळे यांना विचाले असता त्यांनीही सांगितले की भाजपा पक्षाने पंचायत समिती निवडणुक लढण्यास संधी दिली तर जवखेडा (ठेंग) पंचायत समिती गणात येणारे जवखेडा ठेंग, आसई, वरुड (खु )पिंपळगाव ,म्हसरुळ ,घानखेडा , बोरखेडी गायके या गावांचा पंचायत समिती अंतर्गत येणारे योजना मा. केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे दादा आमदार तसेच पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शाने विविध शासकीय योजना गावागावात तळागाळात,शेतकरी राजा, माता भगिनी पर्यंत पोहचविण्याचे काम योग्य पद्धतीने करता येईल आणि पक्षाने दिलेल्या संधीचे व विश्वासाचे सोने करून दाखवता येईल असे सौ. अनिताताई इंगळे यांनी बोलतांना सांगितले .
त्यामुळे जवखेडा ठेंग पंचायत समिती गणातून भाजपा पक्षांतर्गत भाजप चा झेंडा फडकविण्यासाठी सौ.अनिताताई विलासराव इंगळे यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा जनतेतून जोर धरतांना दिसत येत आहे.

Previous articleसागर निंबोंरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का!
Next articleसाक्री पंचायत समिती खोरी गणा मधून पंकज देशमुख यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.