Home गडचिरोली सागर निंबोंरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का!

सागर निंबोंरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का!

153

आशाताई बच्छाव

1002156130.jpg

सागर निंबोंरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!
गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का!

गडचिरोली ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप घडला आहे. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सागर निंबोंरकर आणि त्यांची पत्नी प्रणोती निंबोंरकर सह शेकडो कार्यकर्त्येआज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

हा भव्य पक्षप्रवेश समारंभ शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे विदर्भ संघटक मंत्री डॉ.उपेद्रजी कोठेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. भाजपाच्या झेंड्याखाली निंबोंरकर परिवाराने केलेल्या या प्रवेशामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्य आणि विकासाच्या उपक्रमांमुळे ओळख निर्माण केलेले सागर निंबोंरकर हे तरुण, ऊर्जावान आणि जनसंपर्कात प्रवीण व्यक्तिमत्त्व म्हणून गडचिरोलीत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसच्या गोटात खिळकीळा माजल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

स्थानिक मतदारसंघात आगामी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सागर निंबोंरकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाला नवे बळ मिळणार आहे, तर विरोधकांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रवेशामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, गडचिरोली शहरात आता “सागर निंबोंरकर” या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. लोकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबतही चहू बाजूंनी चर्चा रंगत आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर सागर निंबोंरकर यांनी म्हटलं,

> “गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि युवकांना नवा मार्ग दाखवण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहोत.”

 

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा मोठा पक्षप्रवेश गडचिरोलीच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे, अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया व्यक्त होत आहे
या सोहळ्याला गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड्डीवार,माजी खा.अशोक नेते माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गिताताई हिंगे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभैया कुकरेजा, शहराध्यक्ष अनिल कुंघाडकर, जेष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.