आशाताई बच्छाव
निमगाव जिल्हा परिषद गटा मधून राजेंद्र पाटील राऊत यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार
राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार
मालेगाव (विजय चांदणे प्रतिनिधी)-
निमगाव जिल्हा परिषद गटा मधून राजेंद्र पाटील राऊत यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार
उमेदवारी करणार असल्याचे निश्चित झाल्याने, गटात नवचैतन्याची लाट उसळली आहे.
मुळचे कौळाणे (नि.) येथील रहिवासी असलेले राजेंद्र पाटील राऊत हे सुशिक्षित असून व आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असल्याने त्याशिवाय युवा वर्गासाठी सामाजिक कार्याची आवड सर्वसामान्यांचे हित जपणारे. असल्याने त्यांची उमेदवारी ही निश्चितच विजयश्री खेचून आणेल अशीच चर्चा सध्या तरी निमगाव गटामध्ये ऐकावयास मिळत आहे. राजेंद्र पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी होऊन न्यायासाठी वेळोवेळी लढत आहेत. तसेच धार्मिक व सामाजिक कार्यात दोन पटीने सक्रिय आहेत निमगाव गटासाठी राजेंद्र पाटील राऊत प्रमुख दावेदार म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टी कडून निश्चित उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर निमगाव गटातील जनता समाधान व्यक्त करत आहे. राऊत पाटील यांची खरी ताकत अशी आहे. की आदिवासी बांधवांसह बहुजन समाजाच्या प्रश्नावर ते नेहमीच प्रशासनाशी कागदोपत्री पाठपुरावा करून हक्कासाठी लढत असतात म्हणून राजेंद्र पाटील राऊत यांची दावेदारी प्रमुख मानली जात आहे गटातील गावांचा विचार केला असता मराठा समाजाची मते अधिक असल्याने व राजेंद्र पाटील राऊत हे स्वतः राष्ट्रीय मराठा पार्टी या पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने या निवडणुकीत त्याचा लाभ होईल असा विश्वास असल्याचे शेवटी राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.






