Home जालना जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले...

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोय

132

आशाताई बच्छाव

1002013794.jpg

 

 

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोय

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

जालना, दि.29 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :जोरदार अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत सात हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पुरात सापडलेल्या लोकांना अन्न धान्यासह त्यांच्या जेवणाची देखील सोय केली. केवळ माणसानांच नाही तर शेतकऱ्यांच्या पशूधनाला देखील प्रशासनानेच वाचवले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल कलेक्टर व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

 

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या आपत्तीत नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या भागात पाण्यामुळे धोका निर्माण झाला, त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन त्यांच्या निवास, जेवणा व वैद्यकीय सोय करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रशासनाची तातडीने मदत ; नागरिक व पशूधनाला सुरक्षित हलवले

गोदावरी नदीतून सुमारे 3 लाख क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आल्याने. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतुर तालुक्यांतील गोदावरी नदीच्या काठावरील सुमारे 38 गावे बाधीत झाली आहेत. यामुळे बऱ्याचशा गावांना  स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Previous articleपारध पोलिसांनी मोबाईल चोरास २ लाख ६४ हजार रुपयेचे मोबाईलफोन सह केले  जेरबंद
Next articleदैनिक युवा मराठा चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना साई जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.