आशाताई बच्छाव
पारध पोलिसांनी मोबाईल चोरास २ लाख ६४ हजार रुपयेचे मोबाईलफोन सह केले जेरबंद
जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव रेणुकाई येथे चोरीचे मोबाईल विक्री करताना एका चोरट्याला पारध पोलिसांनी रंगेहात पकडले त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल २ लाख ६४ हजार रुपये किमतीचे चोरलेले मोबाईल हस्तगत केले.या संदर्भात पारध पोलीस ठाण्याचे सपोनी माने यांनी सांगितले की रविवार दिनांक २८ रोजी त्यांना गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली की राजू साहेबराव नरवाडे वय ३२ वर्ष राहणार पिंपळगाव हा बाहेरून चोरून आणलेले मोबाईल गावात विक्री करत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने पोलीस कॉन्स्टेबल निकम जाधव आदींनी सदरील ठिकाणी छापा मारला असता तो इसम चोरीचे मोबाईल विक्री करताना आढळून आला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे १८ मोबाईल किंमत २ लाख ६४ हजार रुपयांचे मिळून आले. हे मोबाईल कुठून आणले याबाबत सतीश मोबाईल छत्रपती संभाजीनगर येथून चोरून आणल्याचे कबूल केले. पोलीस कर्मचारी गणेश निकम यांच्या फिर्यादीवरून नरवाडे यांच्या विरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीट जमादार प्रकाश शिनकर करत आहेत.






