Home जालना सकल धनगर समाजाच्या वतीने आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांना निवेदन

सकल धनगर समाजाच्या वतीने आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांना निवेदन

175

आशाताई बच्छाव

1002013735.jpg

सकल धनगर समाजाच्या वतीने आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांना निवेदन
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
सविस्तर वृत्त भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष दानवे यांना भोकरदन तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की मुख्यमंत्री महोदयांनी बारामती येथे झालेल्या विराट सभेमध्ये तुम्ही आम्हाला निवडून द्या मी तुम्हाला आरक्षण देतो असे जाहीर केली होती माझ्याकडे धनगर समाजास एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी भक्कम पुरावे आहे मी तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण देईल अशी घोषणा केली होती परंतु त्याचा कुठेतरी तुम्हाला विसर पडला असून अद्याप पर्यंत तिची अंमलबजावणी झाली नाही असे धनगर समाजाच्या वतीने बोलल्या जात आहे व तसे निवेदनात नमूद केले जात आहे आपण आमच्या जालना येथे सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेऊन आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे नसता लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल व त्यावेळी काही जीवितहानी झाल्यास त्यास आपण जबाबदार असाल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जालना येथे गेल्या 13 दिवसापासून आमचे नेते दीपक बोराडे उपोषण करत आहे परंतु अद्याप पर्यंत आपण उपोषणाची दखल सुद्धा घेतली नाही आज दिलेल्या निवेदनामध्ये भोकरदन सकल धनगर समाजाच्या वतीने शासनास इशारा देण्यात आले आहे येत्या दोन-तीन दिवसात आपण आमच्या उपोषणाची आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने व धनगरीबांना पद्धतीने आंदोलन छेडल्या जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आमदार संतोष दानवे यांना निवेदन देताना धनगर समाजाचे कार्यकर्ते पंडितरावजी मतकर बाबासाहेब गडकर माणिक रांधवन कचरू रामराव किटे विलास काळे चोरमारे महाराज व इतर बांधव उपस्थित होते