Home जालना माहोरा येथील रेणूका माता मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप

माहोरा येथील रेणूका माता मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप

140

आशाताई बच्छाव

1002001918.jpg

माहोरा येथील रेणूका माता मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे रेणुका देवी संस्थान च्या वतीने मंदीर परिसरा मध्ये लायटिंग आणि पताका लाऊन रोषणाई करण्यात आली आहे.
मराठवाडा विभागातील ग्रामीण परिसरातील भाविकांचे शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रेणुका मातेच्या मंदिरात 22 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवास घटस्थापनेने सुरुवात झाली. नवरात्र उत्सव विजयादशमी पर्यंत चालतो. यामध्ये दररोज सकाळी काकड आरती त्यानंतर ७.३० वाजता आरती होते तसेच परत सायंकाळी ८ वाजता आरती घेतली जाते.असे नित्यनेमाने दररोज आरती घेतली जाते. आरती साठी माहोरा आणि माहोरा परिसरातील भाविक खूप मोठ्या संख्येने हजर असतात. भाविकांची सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत खूप मोठी गर्दी असते.तसेच रात्री दररोज भजनी मंडळे भजन घेतात.सायंकाळच्या आरती नंतर महिलांसाठी गरभा खेळून आनंद व्यक्त करतात. तसेच संगीत खुर्ची असे अनेक कार्यक्रम दररोज असतात. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण पहावयास मिळते.

Previous articleमराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Next articleअहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी आशिया यांचे निर्देश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.