Home बुलढाणा मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

124

आशाताई बच्छाव

1002001908.jpg

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
बुलढाणा विशेष प्रतिनिधी :—प्रकाश खंडागले
महाराष्ट्रात सध्या निसर्गाने थैमान घातले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतमाल उध्वस्त झाला आहे. एकीकडे बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला, तर दुसरीकडे पावसाच्या अतिरेकाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत चालले आहे.
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे राज्य शेतकी विभाग प्रमुख यांनी आज संघटनेतर्फे सरकारकडे तातडीने मागणी केली की,
➡️ महाराष्ट्रात त्वरित दुष्काळ जाहीर करण्यात यावा
➡️ शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी
➡️ व कर्जमाफीसह इतर दिलासा योजनांचा लाभ देण्यात यावा.
“आज शेतकरी शेतात उभ्या पिकाकडे पाहून रडतो आहे. घरातील संसार चालवणे अवघड झाले आहे. शेती हीच शेतकऱ्यांची जीवरेखा आहे, पण निसर्गाच्या कोपामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळणे हीच खरी वेळेची गरज आहे,” असे मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, सरकारने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ठोस पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांचा रोष उफाळून येईल.
 “बळीराजाचा आक्रोश सरकारने ऐकावा आणि महाराष्ट्राला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची आर्त मागणी आहे.” 

Previous articleओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नगरमध्ये हल्ला
Next articleमाहोरा येथील रेणूका माता मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.