आशाताई बच्छाव
पारध बु येथील प्रभाकर दिगंबर लोखंडे यांच्या मकाच्या शेतात
बिबट्याचे दर्शन
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
गेल्या कित्येक दिवसांमध्ये पिंपळगाव रेणुकाई करजगाव कल्याणी तसेच मोहोळई या परिसरामध्ये बिबट्या आल्याची बातम्या प्रकाशित होत होत्या की आज या परिसरामध्ये या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी बिबट्या दिसला तशीच एक बातमी सोमवारला मोहळाई परिसरामध्ये एका बकरीच्या पिल्लाला बिबट्याने मारल्याची बातमी प्रकाशित झाली होती परत आज मंगळवारी पारध बु येथील प्रभाकर लोखंडे यांच्या मक्का च्या शेतामध्ये बिबट्या दिसला असून तो डरकाळी देत असल्याचा आवाज येत होता त्या आवाजाचा रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आला त्यानंतर सदरील बिबट्या उत्तर दिशेला एजाज शेख यांच्या शेताकडे वळला त्यांच्या शेताच्या बाजूलाच मुजाईद शेख यांची शेती असून ते त्या शेताकडून एजाज शेख यांच्या पत्र्याच्या शेड कडे जात होते एजाज शेख यांनी त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड उभारलेले आहे त्या बाजूलाच एक लिंबाचे झाड असून त्यांना लिंबाच्या झाडावरती बिबट्या बसलेला असल्याचे त्यांना दिसले त्यांनी लगेच पळत जाऊन पत्राच्या शेडमध्ये आश्चर्य घेतला मुजाईद शेख घाबरलेल्या मनस्थितीमध्ये मध्येच गावात मीत्राना फोन करून सदर माहिती दिली व आज बाजूच्या शेतकऱ्यांना फोन करून या ठिकाणी बिबट्या असल्याचे कळवले आज बाजूचे शेतकरी येऊन त्या ठिकाणी आरडाओरड केली असता सदरील बिबट्या हा सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाडावरून उतरून बाजूलाच असलेल्या मकाच्या शेतामध्ये त्यांनी पळ काढला शेतकऱ्यांचे वतीने एकच मागणी आहे की वन विभागाने तात्काळ येऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा कारण हा बिबट्या दिसल्याने आज बाजूला शेतामध्ये मकाचा फेरा जास्त प्रमाणात असल्याने शेतात जाणारे शेतकरी एकदम दास्तावलेले असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वन विभागाने तात्काळ या ठिकाणी येऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे






