आशाताई बच्छाव
वालसावंगी येथे ग्रामपंचायत बांधकामाचे भूमिपूजन. भोकरदन जालना गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी आमदार संतोष पाटील दानवे यांनी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत वालसावंगी येथे झालेल्या या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी सुनील पडोळ,सरपंच शंकर भुते ,गणेश इंगळे ,गणेश गाडेकर, प्रकाश पवार ,अजिंक्य वाघ ,मनीष गवळी,लक्ष्मण मळेकर,किरण राजे कोथळकर ,रखमाजी कोथळकर ,किरण फुसे, रमेश काटकर यांच्यासह वालसावंगी ,धावडा, पारध,पद्मावती,सुंदर वाडी येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






