Home जालना पारध बु येथील प्रभाकर दिगंबर लोखंडे यांच्या मकाच्या शेतात बिबट्याचे दर्शन

पारध बु येथील प्रभाकर दिगंबर लोखंडे यांच्या मकाच्या शेतात बिबट्याचे दर्शन

194

आशाताई बच्छाव

1001937287.jpg

पारध बु येथील प्रभाकर दिगंबर लोखंडे यांच्या मकाच्या शेतात
बिबट्याचे दर्शन
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
गेल्या कित्येक दिवसांमध्ये पिंपळगाव रेणुकाई करजगाव कल्याणी तसेच मोहोळई या परिसरामध्ये बिबट्या आल्याची बातम्या प्रकाशित होत होत्या की आज या परिसरामध्ये या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी बिबट्या दिसला तशीच एक बातमी सोमवारला मोहळाई परिसरामध्ये एका बकरीच्या पिल्लाला बिबट्याने मारल्याची बातमी प्रकाशित झाली होती परत आज मंगळवारी पारध बु येथील प्रभाकर लोखंडे यांच्या मक्का च्या शेतामध्ये बिबट्या दिसला असून तो डरकाळी देत असल्याचा आवाज येत होता त्या आवाजाचा रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आला त्यानंतर सदरील बिबट्या उत्तर दिशेला एजाज शेख यांच्या शेताकडे वळला त्यांच्या शेताच्या बाजूलाच मुजाईद शेख यांची शेती असून ते त्या शेताकडून एजाज शेख यांच्या पत्र्याच्या शेड कडे जात होते एजाज शेख यांनी त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड उभारलेले आहे त्या बाजूलाच एक लिंबाचे झाड असून त्यांना लिंबाच्या झाडावरती बिबट्या बसलेला असल्याचे त्यांना दिसले त्यांनी लगेच पळत जाऊन पत्राच्या शेडमध्ये आश्चर्य घेतला मुजाईद शेख घाबरलेल्या मनस्थितीमध्ये मध्येच गावात मीत्राना फोन करून सदर माहिती दिली व आज बाजूच्या शेतकऱ्यांना फोन करून या ठिकाणी बिबट्या असल्याचे कळवले आज बाजूचे शेतकरी येऊन त्या ठिकाणी आरडाओरड केली असता सदरील बिबट्या हा सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाडावरून उतरून बाजूलाच असलेल्या मकाच्या शेतामध्ये त्यांनी पळ काढला शेतकऱ्यांचे वतीने एकच मागणी आहे की वन विभागाने तात्काळ येऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा कारण हा बिबट्या दिसल्याने आज बाजूला शेतामध्ये मकाचा फेरा जास्त प्रमाणात असल्याने शेतात जाणारे शेतकरी एकदम दास्तावलेले असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वन विभागाने तात्काळ या ठिकाणी येऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे

Previous articleवालसावंगी येथे ग्रामपंचायत बांधकामाचे भूमिपूजन
Next articleघर का भेदी लंका डायहे” कर्मचारीस निघाला पेट्रोल पंप चालकाला मारहाण करून लुटणारा दोन भामटे पकडले. चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.