Home जालना येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसांची बैठक छत्रपती...

येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात यावी

176

आशाताई बच्छाव

1001930291.jpg

येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात यावी
डॉ. संजय लाखेपाटील यांची आग्रही मागणी
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : “हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील वांझोट्या बैठकीनंतर दोन/तिन वर्षांपासून न झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक 16/17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करून मराठवाड्याच्या विकासाचे प्रलंबित विविध प्रश्न आणि त्यासाठी निधी यासंबंधी निर्णय व्हायला पाहिजेत अशी आग्रही मागणी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय लाखेपाटील आणि पदाधिकारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेल/निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना डॉ. संजय लाखेपाटील यांनी सांगितले की, विदर्भ हा नागपूर कराराने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यात  सामिल झाला आणि त्या नागपूर करारातील एका कलमान्वये दरवष नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन विदर्भाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी तरतूद आहे आणि त्यानुसार दरवष नागपूर येथे साधारण तिन आठवड्याचे हिवाळी अधिवेशनात आयोजित केले जाते, परंतु दुर्दैवाने तत्कालीन मराठवाड्याच्या नेतृत्वाला भविष्यकाळीन आव्हानांचा अंदाज न आल्यामुळे अतिशय मोकळ्या मनाने त्यांनी विना अट मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यात सामिल होण्याचा निर्णय केला  आणि तत्कालीन मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी विनाकरार महाराष्ट्रात सामील मराठवाड्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही; नव्हे आम्ही त्यांना अधिकचे देऊ असा शब्द व बांधिलकी महाराष्ट्र विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनात 1 मे 1960 रोजी घालून घेतली. परंतु दुर्दैवाने हा शब्द नंतरच्या नेतृत्वाने पाळला नाही.

Previous articleमहावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन   
Next article१२ तासांचा कामाचा दिवस : कामगारहितास प्रतिकूल पाऊल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.