Home जालना महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन   

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन   

132

आशाताई बच्छाव

1001930263.jpg

महावीर चौकात हिरव्या झेंड्याविरोधात जैन समाजाने प्रशासनाकडे निवेदन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : जालना शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या महावीर चौकात हिरवा झेंडा लावण्यात आल्याने जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. महावीर चौक हा जैन समाजासाठी धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठिकाण असून, येथे भगवान महावीर स्वामी यांचे स्मृतीचिन्ह आहे. या धार्मिक स्थळावर अशा प्रकारची अनधिकृत कृती झाल्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत.
यासंदर्भात जैन समाजाच्या वतीने जालना महानगरपालिका आयुक्त, मा. पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस स्टेशन तसेच मा. पोलीस अधीक्षक जालना यांना स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि.7 सप्टेंबर रोजी महावीर चौक परिसरात हिरवा झेंडा लावलेला आढळून आला आणि हा प्रकार शहरातील शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येते.
सकल जैन समाज सेवा व सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलताना अक्षय गोरंट्याल म्हणाले, “अलीकडेच आमच्या महावीर भगवान यांच्या स्मारक सेवापुतळा चौकात चुकीची घटना घडली. त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावण्यात आला होता. तो आम्ही काढून टाकला असून, समाज व सकल हिंदू समाजाने गोमूत्राने पूर्ण परिसराची स्वच्छता करून पुन्हा आमचा झेंडा लावला आहे. यापूर्वीच आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार व अनेक निवेदनं दिली होती. आता या घटनेनंतर आम्ही महापालिकेतही निवेदन देणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पुरावे मिळतील आणि त्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. पोलिसांना आमची एकच विनंती आहे की अशा घटना सतत घडू नयेत. मागील 1 तारखेलाही अशीच घटना घडली होती. त्या वेळी तत्पर कारवाई केल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभारी आहोत.

Previous articleजिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न
Next articleयेत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात यावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.