आशाताई बच्छाव
येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात यावी
डॉ. संजय लाखेपाटील यांची आग्रही मागणी
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : “हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील वांझोट्या बैठकीनंतर दोन/तिन वर्षांपासून न झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक 16/17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करून मराठवाड्याच्या विकासाचे प्रलंबित विविध प्रश्न आणि त्यासाठी निधी यासंबंधी निर्णय व्हायला पाहिजेत अशी आग्रही मागणी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय लाखेपाटील आणि पदाधिकारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेल/निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना डॉ. संजय लाखेपाटील यांनी सांगितले की, विदर्भ हा नागपूर कराराने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यात सामिल झाला आणि त्या नागपूर करारातील एका कलमान्वये दरवष नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन विदर्भाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी तरतूद आहे आणि त्यानुसार दरवष नागपूर येथे साधारण तिन आठवड्याचे हिवाळी अधिवेशनात आयोजित केले जाते, परंतु दुर्दैवाने तत्कालीन मराठवाड्याच्या नेतृत्वाला भविष्यकाळीन आव्हानांचा अंदाज न आल्यामुळे अतिशय मोकळ्या मनाने त्यांनी विना अट मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यात सामिल होण्याचा निर्णय केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी विनाकरार महाराष्ट्रात सामील मराठवाड्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही; नव्हे आम्ही त्यांना अधिकचे देऊ असा शब्द व बांधिलकी महाराष्ट्र विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनात 1 मे 1960 रोजी घालून घेतली. परंतु दुर्दैवाने हा शब्द नंतरच्या नेतृत्वाने पाळला नाही.






