Home पुणे रुग्णांच्या सोयीसाठी तत्पर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची तातडीची हस्तक्षेप

रुग्णांच्या सोयीसाठी तत्पर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची तातडीची हस्तक्षेप

224

आशाताई बच्छाव

1001930129.jpg

रुग्णांच्या सोयीसाठी तत्पर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची तातडीची हस्तक्षेप
पुणे : निवासी संपादक उमेश पाटील
सोनोग्राफी मशीनची कमतरता – खासदार बारणे यांच्या हस्तक्षेपाने तोडगा
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये फक्त एकच सोनोग्राफी मशीन कार्यरत असल्याने महिलांना तसेच लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच एन.आय.सी.यू. बेड्सचीही मर्यादित उपलब्धता असल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी अडचण निर्माण होत आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी युवा सेना जिल्हाप्रमुख सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पाचर्णे यांनी आज मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना भेटून या गंभीर प्रश्नाची माहिती दिली व निवेदन सादर केले.
खासदार बारणे यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेबजी वाल्हेकर, युवा सेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले, तळेगाव शहरप्रमुख देव खतरमल उपस्थित होते.
➡️ आपलाच – सागर दत्तात्रय पाचर्णे
युवा सेना जिल्हाप्रमुख, मावळ लोकसभा
शिवसेना वैद्यकीय कक्ष, मावळ लोकसभाप्रमुख

Previous articleशिवसेनेचा महावितरणला इशारा : स्मार्ट मीटर बसविणे थांबवा, अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन.
Next articleभोकरदन शहरातील गणेश भक्ताच्या वतीने गणरायाला निरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.