आशाताई बच्छाव
भोकरदन शहरातील गणेश भक्ताच्या वतीने गणरायाला निरोप
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन शहरातील नागरिकांच्या वतीने व गणेश भक्ताच्या वतीने आज गणरायाला निरोप देण्यात आला पोलीस स्टेशन भोकरदन या ठिकाणी सुद्धा अकरा दिवस गणरायाची स्थापना करण्यात आली होती व विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पोलिसांच्या वतीने प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी बरेचसे नागरिकांनी या प्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर पोलीस बांधवांच्या वतीने गणेशाची मिरवणूक करून सर्वप्रथम गणेश विसर्जन करण्यात आले व त्यानंतर सर्व पोलीस बांधव गावातील मंडळांच्या मिरवणुकीसाठी सज्ज झाले यावेळी भोकरदन येथील तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे भोकरदन पोलीस स्टेशनचेंं पोलीस निरीक्षक बिडवे साहेब माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख महादू शेठ राजपूत रणवीर भैया देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष फकीरा शेठ देशमुख नानासाहेब वानखेडे गजेंद्र लोखंडे दैनिक कलम वीर तालुका प्रतिनिधी भोकरदन व शहरातील नागरिक शासकीय राजकीय तसेच इतर नागरिक गणरायाच्या मिरवणूक मध्ये सहभागी होते लहान थोर मंडळींच्या गणरायाच्या जयघोष करण्यात आला तसेच फटाक्याची अतिशय ढोल ताशाच्या वेगवेगळ्या मंडळाच्या वाजवण्याच्या शर्यती पाहायला मिळा ले पोस्ट ऑफिस पासून निघालेले मिरवणूक भोकरदन शहरात पोलीस स्टेशन समोरील चौकात येथे त्या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणेश मंडळाच्या वतीने प्रमुख तिथीचे व मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत करण्यात आले या नंतर मिरवणूक भोकरदन शहरातून गणरायाच्या जय घोषामध्ये विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ झाली ढोल ताशाच्या गजराने भोकरदन शहर दुमदुमून गेले होते लहान थोर मंडळींनी यामध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. डीजे मुक्त भोकरदन शहर या अगोदरच घोषित झालेले असून आज पारंपारिक ढोल ताशे वाजवून मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये ताशा वाजवणे ढोल वाजवणे व इतर परंपरीक वाद्य वाजवून मोठ्या जल्लोषात आज या गणरायाला निरोप देण्यात आला या मिरवणुकीमध्ये प्रत्येक जण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गर्जना देत होते अशा पद्धतीने मिरवणूक पुढे पुढे जात होती तसतसे गर्जना देत गणरायाला निरोप देण्यात आला






