आशाताई बच्छाव
रुग्णांच्या सोयीसाठी तत्पर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची तातडीची हस्तक्षेप
पुणे : निवासी संपादक उमेश पाटील
सोनोग्राफी मशीनची कमतरता – खासदार बारणे यांच्या हस्तक्षेपाने तोडगा
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये फक्त एकच सोनोग्राफी मशीन कार्यरत असल्याने महिलांना तसेच लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच एन.आय.सी.यू. बेड्सचीही मर्यादित उपलब्धता असल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी अडचण निर्माण होत आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी युवा सेना जिल्हाप्रमुख सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पाचर्णे यांनी आज मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना भेटून या गंभीर प्रश्नाची माहिती दिली व निवेदन सादर केले.
खासदार बारणे यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेबजी वाल्हेकर, युवा सेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले, तळेगाव शहरप्रमुख देव खतरमल उपस्थित होते.
➡️ आपलाच – सागर दत्तात्रय पाचर्णे
युवा सेना जिल्हाप्रमुख, मावळ लोकसभा
शिवसेना वैद्यकीय कक्ष, मावळ लोकसभाप्रमुख






