Home नांदेड शिवसेनेचा महावितरणला इशारा : स्मार्ट मीटर बसविणे थांबवा, अन्यथा आमरण उपोषण व...

शिवसेनेचा महावितरणला इशारा : स्मार्ट मीटर बसविणे थांबवा, अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन.

258

आशाताई बच्छाव

1001930121.jpg

शिवसेनेचा महावितरणला इशारा : स्मार्ट मीटर बसविणे थांबवा, अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवार दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या वतीने देगलूर महावितरण कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री. चाटे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देगलूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या चार महिन्यांपासून हजारो नागरिकांचे विजेचे मीटर जम्पिंग होऊन प्रचंड विजबिले आकारली जात आहेत. यावर तोडगा काढण्याऐवजी महावितरण कंपनी दुरुस्तीच्या नावाखाली दररोज ४० ते ५० स्मार्ट मीटर बसवत असून, या मीटरमुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसविणे तातडीने थांबवावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला की, १५ दिवसांच्या आतही जर पुन्हा स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू केले तर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलनासह “स्मार्ट मीटर फोडा आंदोलन” छेडण्यात येईल.

या आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, शहरप्रमुख संजय जोशी, शहरप्रमुख रवी उल्लेवार, युवा सेना तालुका प्रमुख व शिवसेना सोशल नेटवर्कर भागवत पाटील सोमुरकर, उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार, उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना पदाधिकारी विनोद सोनकांबळे, शहर समन्वयक संतोष कांबळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष नागेश गुडलावार, उपतालुकाप्रमुख मानाजी पाटील लोणे, शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर आदींसह शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.