Home नांदेड शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. जिल्हाधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या...

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. जिल्हाधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन.

216

आशाताई बच्छाव

1001922828.jpg

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. जिल्हाधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये अनुदान, पीक विमा, कर्ज माफी,घरपडी त्वरित देण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि.11 सप्टेंबर रोजी देगलूर येथील नविन बसस्थानक नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यासह प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की,देगलूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन वेळा सतत अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांनी निसर्गाच्या भरवशावर उसनवारी करून महागामोलाचे बियाणे खते कीडनाशके खरेदी करून खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उडीद मूग आदी पिकांची लागवड केली होती पण कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ या शेतकऱ्यांच्या नशिबी सटवीने पाचविला पुजलेल्या अलिखित लिहून ठेवलेल्या नशिबी नुसार निसर्गाच्या नेहमीच्याच दुष्टचक्रामुळे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्यात जमा झालेली आहेत गेल्या 5 वर्षा पासुन ओला दुष्काळ पडला असल्याने शेतकरी राजा कर्ज बाजारी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे आर्थिक अडचणीत मुळे आत्महत्या सारखा अघोरी कृत्य करीत आहेत यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सुद्धा खरीप हंगामातील पीक वाया गेली आहेत अतिवृष्टीच्या यादीतून हणेगाव प्रशासनाने वगळण्यात आला असल्याने विभागांतील शेतकरी बांधवांना अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे तरी हणेगाव विभाग अतिवृष्टीच्या अनुदानातून न वगळता देगलूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यां सोबतच हणेगाव विभागातील शेतकरी बांधवांना सुद्धा एकरी 25 हजार रुपये अनुदान देण्यात यावे , तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावे, पीक कर्ज माफ करावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि.11 सप्टेंबर रोजी देगलूर नवीन बसस्थानक नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घेऊन त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे यावेळी महेश पाटील देगलूर शिवसेना बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, मुखेड शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, शहर प्रमुख संजय जोशी, शहर प्रमुख रवि उल्लेवार शिवसेना देगलूर तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्क प्रमुख, अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफ भाई मिस्त्री, विभाग प्रमुख राजु उल्लेवार मुजळगेकर, सरपंच बालाजी उल्लेवार, शिवसेना उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना पदाधिकारी राहुल सोनकांबळे,युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे आदीसह शेकडो शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते- निवेदनाच्या प्रति मा.उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर ,तहसीलदार साहेब कार्यालय देगलूर यांना देण्यात आले आहे.

Previous articleउंद्री प.दे .येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी.
Next articleएक गाव एक गणपती.. टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाचा निरोप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.