आशाताई बच्छाव
उंद्री प.दे .येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी.
ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे ता.मुखेड येथे ऑगस्ट महिन्यातील २७ व २८ ऑगस्ट रोजी ५६.८ मिमी व १२५.५ मिमी एवढा विक्रमी पाऊस झाल्याने उंद्री येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नाल्याशेजारील शेतजमिनीतील गाळ व माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांची शेतजमीनी भविष्यातही लागवडीयोग्य राहिल्या नाहीत.याकारणे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी.
जाहुर-देगलुर या मुख्य रस्त्यावरील नवी आबादी व सार्वजनिक स्मशानभुमी जवळ असलेल्या दोन्ही पुलांचे नवीन बांधकाम करावे तसेच पाझरतलाव ते चोंडी शिव पर्यंत मुख्य नाल्याचे व बेंडकी तांडा ते मुख्य नाला पर्यंत रुंदीकरण व खोलीकरण करावे या दोन्ही बाबींसाठी मा.नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मारोती पाटील मटके(ता.कॉंग्रेस सचिव)शिवाजीराव पंदनवाड(मा.सरपंच प्र),ज्ञानेश्वर पाटील उंद्रीकर,हणमंत पा वडजे,प्रभाकर देशाई पवार,गणेश देशाई पवार,हणमंत देशाई पवार,माधव देशाई पवार आदी उपस्थित होते.






