Home जालना भोकरदन शहरातील गणेश भक्ताच्या वतीने गणरायाला आज निरोप

भोकरदन शहरातील गणेश भक्ताच्या वतीने गणरायाला आज निरोप

128

आशाताई बच्छाव

1001922813.jpg

भोकरदन शहरातील गणेश भक्ताच्या वतीने गणरायाला आज निरोप
गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन शहरातील नागरिकांच्या वतीने व गणेश भक्ताच्या वतीने आज गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी भोकरदन तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिडवे साहेब माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख रणवीर भैया देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष फकीरा शेठ देशमुख नानासाहेब वानखेडे गजेंद्र लोखंडे दैनिक कलम वीर तालुका प्रतिनिधी भोकरदन व शहरातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय राजकीय तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक गणरायाच्या मिरवणूक मध्ये सहभागी होते लहान थोर मंडळींच्या वतीने गणरायाला मोठ्या उत्साहाने आज निरोप देण्यात आला यावेळी ढोल ताशाच्या गजराने भोकरदन शहर दुमदुमून गेले होते लहान थोर मंडळींनी यामध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. डीजे मुक्त भोकरदन शहर या अगोदरच घोषित झालेले असून आज पारंपारिक ढोल ताशे वाजवून मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये ताशा वाजवणे ढोल वाजवणे व इतर परंपरीक वाद्य वाजवून मोठ्या जल्लोषात आज या गणरायाला निरोप देण्यात आला या मिरवणुकीमध्ये प्रत्येक जण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गर्जना देत होते अशा पद्धतीने मिरवणूक पुढे पुढे जात होती तसतसे गर्जना देत गणरायाला निरोप देण्यात आला

Previous articleरामभाऊ आवारे यांना आस्था सामाजिक संस्थेचा महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार जाहीर
Next articleउंद्री प.दे .येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.