आशाताई बच्छाव
एक गाव एक गणपती..
टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाचा निरोप.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
लिंगनकेरुर ता. देगलूर. नांदेड येथे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक गाव एक गणपती या नियमाचे पालन करून सर्व गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली दहा दिवस गावातील सर्व लहान थोर यांनी मनोभावे गणरायाची सेवा केली व अकराव्या दिवशी डीजे ढोल ताशा याचा वापर न करता टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक लहान थोर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या.






