Home बुलढाणा EXCLUSIVE ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ उपक्रमात विद्याधर महाले यांचे अडथळे !...

EXCLUSIVE ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ उपक्रमात विद्याधर महाले यांचे अडथळे ! – आमदार श्वेता महाले ‘वोट चोरी’मुळे निवडून आल्याचा राहुल बोंद्रेचा आरोप ! – आणखी काय म्हणाले राहुल बोंद्रे ?

216

आशाताई बच्छाव

1001921336.jpg

EXCLUSIVE ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ उपक्रमात विद्याधर महाले यांचे अडथळे ! – आमदार श्वेता महाले ‘वोट चोरी’मुळे निवडून आल्याचा राहुल बोंद्रेचा आरोप ! – आणखी काय म्हणाले राहुल बोंद्रे ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- चिखली धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ या घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस जिल्ह्यात चांगलाच गाजला. चिखलीत तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे पीए विद्याधर महाले यांच्या आदेशाने काँग्रेसचे फलक काढण्यात येऊन उपक्रमात अडथळे निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन केला आहे. विद्याधर महाले यांच्या पत्नी आमदार श्वेता महाले ह्या वोट चोरीमुळे निवडून आल्याचे सिद्ध झाल्याचे बोंद्रे म्हणालेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तत्पूर्वीच वोट चोरीची वाट दाखवून दिली होती. ते या संदर्भात देशभर जागर करीत आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात काँग्रेस कडून ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ हा उपक्रम ब्लॉक व तालुकास्तरावर राबवण्यात आला. मात्र भाजपाने या उपक्रमात अडथळे निर्माण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्सनल पिए तथा चिखली मतदारसंघातील आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांनी चिखली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांचेवर दबावतंत्राचा वापर करत ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ हे उपक्रमातील परवानगी घेऊन लावलेले बॅनर जबरदस्तीने काढून घेण्याचे फार्मान सोडले. त्यामुळे सर्व बॅनर काढून घेण्यात आले, आयोजकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे हा मुख्याधिकारी भ्रष्टाचारी आहे आणि भाजपाचा कार्यकर्ता असल्यासारखा वागतो, असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वोट चोरी

Previous articleअल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल
Next articleरामभाऊ आवारे यांना आस्था सामाजिक संस्थेचा महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.